Skip to main content

Impairment (दोष), Disabilty (अक्षमता), Handicap (अपंगत्व)

 

दोष (Impairment), अक्षमता (Disability) आणि अपंगत्व / अडथळा (Handicap) या संज्ञा रोजच्या बोलण्यात अनेकदा एकाच अर्थाने वापरल्या जातात, परंतु वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्यामध्ये महत्त्वाचे फरक आहेत.

 

या तीन संज्ञांचा संबंध एका साखळीप्रमाणे आहे: दोष (Impairment) अक्षमता (Disability) येणारा अडथळा म्हणजेच अपंगत्व (Handicapness). दोष शरीरात असतो, अक्षमता व्यक्ती अनुभवते, आणि समाजातील अडथळे अपंगत्व निर्माण करतो.

Ø  दोष (Impairment) ही संज्ञा प्रामुख्याने मानवी शरीराच्या जैविक आणि शारीरिक रचनेशी संबंधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) १९८० च्या व्याख्येनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक, शारीरिक किंवा शरीरशास्त्रीय संरचनेत किंवा कार्यात काही घट होते किंवा एखादी जैव‍िक विकृती निर्माण होते, तेव्हा त्याला 'दोष' असे संबोधले जाते. हा बदल अवयव किंवा शरीर संस्थेच्या स्तरावर घडत असतो. उदाहरणार्थ, कानाच्या अंतर्गत रचनेत बिघाड असणे, डोळयांमध्ये बाहुली व‍िकसीत न होणे, हातापायांची रचना वेगळी असणे किंवा मेंदूची वाढ अपूर्ण राहणे हे दोषाचे प्रकार आहेत. थोडक्यात, हा शरीरातील प्रत्यक्ष जैवीक बिघाड किंवा विसंगती आहे.

 

Ø  अक्षमता (Disability) एखाद्या शारीरिक किंवा मानसिक दोषामुळे व्यक्तीला एखादी क्रिया "सामान्य" मानवाप्रमाणे करणे कठीण जाते, तेव्हा त्याला ‘अक्षमता’ म्हटले जाते. ही दोषाचा कार्यात्मक पर‍िणाम आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन क्रिया करण्याच्या क्षमतेवर मर्यादा आणते तेव्हा हा एक कार्यात्मक दृष्टिकोन (Functional construct) असून तो संपूर्ण व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. उदाहरणार्थ, डोळ्यांच्या बुबुळातील दोषामुळे (Impairment) अंधत्व येणे ही 'अक्षमता' (Disability)आहे, कारण यामुळे व्यक्तीला वाचणे किंवा पाहणे यांसारख्या सामान्य क्रिया करता येत नाहीत. तसेच, चालता न येणे, स्पष्ट ऐकू न येणे किंवा शिकण्यात अडथळे येणे ही अक्षमतेची उदाहरणे आहेत.

 

Ø  अपंगत्व (Handicap) ही संज्ञा पूर्णपणे सामाजिक आणि पर्यावरणीय संदर्भात वापरली जाते. जेव्हा एखादा दोषामुळे न‍िर्माण झालेली अक्षमता व्यक्तीला समाजातील तिची "सामान्य" कार्ये किंवा भूमिका पार सहजपणे पार पाडण्यापासून रोखते, तेव्हा तिला 'अडथळा' निर्माण झाला असे म्हणतात आण‍ि त्यातुन अपंगत्वाची जाणीव न‍िर्माण होते. म्हणजेच जेव्हा एखाद्या व्यक्तीची अक्षमता समाजातील अपेक्षित भूमिका, जबाबदाऱ्या किंवा संधी पूर्ण करण्यास अडथळा निर्माण करते, तेव्हा ती अवस्था अपंगत्व म्हणून ओळखली जाते. हा स्तर समाज स्तरावर (Societal Level) घडतो. ही भूमिका व्यक्तीचे वय, लिंग आणि सामाजिक-सांस्कृतिक घटकांवर अवलंबून असते. अडथळा हा व्यक्ती आणि तिचे वातावरण यांच्यातील विषम संघर्षातून निर्माण होतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती व्हिलचेअर वापरते (अक्षमता), पण जर सार्वजनिक इमारतीत रॅम्प नसेल, तर त्या व्यक्तीला प्रवेश मिळणे कठीण होते; येथे रॅम्पचा अभाव हा 'अडथळा' ठरतो. जर समाजाने अडथळा मुक्त वातावरण निर्माण केले, तर अक्षमता असूनही व्यक्तीला समाजात वावरताना अडथळा किंवा अपंगत्व जाणवणार नाही.

या तिन्ही संज्ञांचा संबंध एका साखळीप्रमाणे जोडलेला असतो: दोष (शरीर स्तर) अक्षमता (व्यक्ती स्तर) अपंगत्व (समाज स्तर). आधुनिक काळात जागतिक आरोग्य संघटनेने (ICF 2001) 'अडथळा/अपंगत्व' (Handicap) हा शब्द बदलून त्याऐवजी 'सहभागातील निर्बंध' (Participation Restriction) ही अधिक सकारात्मक संज्ञा स्वीकारली आहे. आता "अक्षमता" (Disability) हा शब्द एक सर्वसमावेशक संज्ञा म्हणून वापरला जातो, ज्यामध्ये शारीरिक दोष, क्रियांच्या मर्यादा आणि सामाजिक सहभागातील अडथळे या तिन्ही बाजूंचा विचार केला जातो.

दोष (Impairment), अक्षमता (Disability) आणि अडथळा (Handicap) यातील फरक -

घटक / मुद्दा

दोष (Impairment)

अक्षमता (Disability)

अपंगत्व / अडथळा (Handicap)

संज्ञात्मक अर्थ

शरीरातील किंवा मनातील एखाद्या अवयवाच्या रचनेत किंवा कार्यात झालेला जैविक बिघाड

दोषामुळे व्यक्तीच्या दैनंदिन क्रिया करण्याच्या क्षमतेत आलेली मर्यादा

अक्षमता असल्याने समाजात भूमिका निभावताना येणारा अडथळयामुळे अपंगत्वाची जाणीव

व्याख्या

मनोवैज्ञानिक, शरीरशास्त्रीय किंवा शारीरिक संरचनेत किंवा कार्यप्रणालीत झालेली कोणतीही हानी किंवा विकृती म्हणजे 'दोष'

एखाद्या दोषामुळे निर्माण झालेली, मानवासाठी सामान्य मानल्या जाणाऱ्या मर्यादेत एखादी क्रिया करण्याच्या क्षमतेतील कमतरता किंवा येणारी मर्यादा म्हणजे 'अक्षमता'

दोष किंवा अक्षमतेमुळे एखाद्या व्यक्तीला तिचे वयानुसार लिंगानुसार किंवा व्यक्तीम्हणुन अपेक्षित असलेली सामान्य भूमिका बजावण्यापासून रोखणारी स्थिती म्हणजे 'अपंगत्व'

पातळी (Level)

शरीर स्तर (Body Level)

व्यक्ती स्तर (Person Level)

समाज स्तर (Societal Level)

स्वरूप

वैद्यकीय / शार‍िरीक

कार्यात्मक

सामाजिक

कशाशी संबंधित

अवयव, स्नायू, मेंदू, इंद्रिये

चालणे, पाहणे, ऐकणे, शिकणे, बोलणे

शिक्षण, रोजगार, सामाजिक सहभाग

निर्मिती कशी होते

आजार, अपघात, जन्मजात दोष, संसर्ग

दोषाचा क्षमतेवरील परिणाम

समाजातील अडथळे, नकारात्मक दृष्टिकोन, सुविधा अभाव

उदाहरण (दृष्टी, मेंदु)

डोळ्यांच्या रचनेतील दोष, मेंदुची अपुर्ण वाढ

दिसण्यास असमर्थता (अंधत्व), बौद्ध‍िक अक्षमता

ब्रेल/ऑडिओ सुविधा नसल्याने शिक्षणात अडथळा, समाजातील समायोज‍ित वातावरणात वावरताना येणारा अडथळा.

उदाहरण (चालणे)

पायातील स्नायू किंवा मज्जातंतू दोष

चालता न येणे

रॅम्प नसल्याने इमारतीत सहजपणे प्रवेश करता न येणे.(अपंगत्वाची जाणीव)

दिसते का?

कधी दिसते, कधी अदृश्य असते

बहुतेक वेळा जाणवते

परिस्थितीनुसार जाणवते

तीव्रता

दोष कायमस्वरूपी असतो

प्रशिक्षण/उपचाराने अक्षमतेची तीव्रता कमी होऊ शकते

सुव‍िधा व विशेष सहाय्य साधनाने अपंगत्वावर मात करता येऊ शकते.

न‍िवारण

डॉक्टर, वैद्यकीय उपचार

पुनर्वसन, विशेष शिक्षण

समाज, शासन, धोरणे, पायाभूत सुविधा आण‍ि व‍िशेष सहाय्यक साधने

दृष्टीकोन

वैद्यकीय दृष्टिकोन

कार्यक्षमतेचा दृष्टिकोन

सामाजिक समावेशनाचा दृष्टिकोन

प्रमाण

Body Structure/Function Impairment (एक किंवा अनेकविध शारिरिक रचना व कार्यप्रणालीतील दोष असु शकतात.)

Activity Limitation(एक किंवा अनेक बाबतीत कार्यक्षमतेवर मर्यादा येऊ शकतात.)

Participation Restriction (एका कार्याबाबत किंवा अनेक कार्यांबाबत न‍िर्बंधीत किंवा मर्यादीत असलेला समाजातील सहभाग)

 

 

Comments

Popular posts from this blog

नेटफ्लिक्स वरील जगप्रसिद्ध वेबसेरीज स्क्विड गेम वास्तविक ? Is Netflix's Squid Game Real ?

  हिंसेच्या छायेत मनोरंजन: स्क्विड गेम ते मांजरींचा छळ – आपणच उघडली आहेत विकृततेची दारे           Photo  :  Courtesy of Netflix Collection तारीख: ४ ऑक्टोबर २०२५ आजच्या डिजिटल युगात, जेव्हा एका क्लिकने जगभरातील बातम्या आपल्या हातात येतात, तेव्हा एका बाजूला प्रगतीची चमक दिसते आणि दुसरीकडे अंधारातील भयानक सत्य उघड होते. बीबीसी न्यूजच्या अलीकडील तपासाने एका जागतिक नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे, ज्यात हजारो सदस्य मांजरी आणि त्यांच्या पिल्लांवर अत्याचार करून व्हिडिओ तयार करतात, शेअर करतात आणि विकत घेतात. हे नेटवर्क, ज्याची सुरुवात चीनमध्ये झाली आणि आता यूके, जपानसह जगभर पसरले आहे. आपल्या मनोरंजनाच्या पसंतीकडे. स्क्विड गेम SQUID GAME (2021-25) , सॉ SAW (2005) सारख्या चित्रपट आणि वेबसीरीज, ज्यात गरजू माणसे मनोरंजनासाठी शिकार बनवली जातात, त्यांच्या यशामुळे आपण एक नवीन ट्रेंड निर्माण करत आहोत. हे ट्रेंड केवळ काल्पनिक नाही; ते वास्तविक हिंसेसाठी दारे उघडते आणि आपल्या चालू पिढीला संवेदनशीलतेच्या गर्तेत ढकलते. आपणच, या हिंसक कथांना 'रोमांचक' म्हणून स्वीका...

क्या होता है क्रेडिट कार्ड (Credit Card)...किस-किस केलिए फायदेमंद है क्रेडिट कार्ड ..... शायद आप केलिए भी हो !!!

   क्रेडिट कार्ड लेने जा रहे हैं तो जान ले पुरी जानकारी एकही जगह और एक ही क्लिक पर       दोस्तों आप तो क्रेडिट कार्ड के बारे अक्सर सुनते है और काफी लोग तो जानते भी होंगे और इस्तेमाल भी करते होंगे, लेकिन फिर भी क्या आप क्रेडिट कार्ड के बारे में आपको पूरी और सही  जानकारी है ?        यूट्यूब जैसी साइट पर ढेर सरे वीडियो भरे पड़े है जो आपको  क्रेडिट कार्ड के बारे में शिक्षित करने का दवा करते है लेकिन मेरी बात मन लो तो आप देख पाएंगे  के यह वीडियो सिर्फ किसी एक मुद्दे पर ही केंद्रित रहता है और आप को पूरी जानकारी नहीं मिल पाती।    आखिर यूटूबर  के द्वारा दिया जानेवाला सुझाव हमें किसी ठोस निर्णय पर नहीं पहुँचाता। इसीलिए  आप ये आर्टिकल पढ़े तो आप इसमें से क्रेडिट कार्ड के और उसके इस्तेमाल के बारे में एक ही समय में पूरी तरह से शिक्षित हो जायेंगे ; तथा आपको सही निर्णय लेने में कोई परेशानी नहीं होगी।  क्या है क्रेडिट कार्ड  १. क्रेडिट कार्ड एक प्लास्टिक का स्मार्ट कार्ड होता है जैसे की हमारा एटीएम (ATM) ...

चाहे आप कितने भी हेल्थी डायट (Diet) करते हो...इनके बिना आपका दिल (Heart) और फेफड़े (Lungs) सेहतमंद नही हो सकते !!!

  नमस्कार  बंधुजन,            आज हम साथ आये है एक नए विषय पर जहा अपने सेहत  (Health) को लेकर संवेदनशील रहनेवाले (Health Conscious) हर क्लास से लेकर अप्पर क्लास के फैमिलीज़ की लाइफस्टाइल को आरोग्य के प्रति संवेदनशीलता को पूर्ण रूप से जागरूक बना सके। हम सभी जानते है की अगर ज़िन्दगी के हर पल का मजा लेने के लिए एक अच्छी सेहत होनी काफी ज़रूरी है।            देखा जाये तो  हमारी भागदौड़ की ज़िन्दगी में अपनी सेहत का ख्याल रखना पहले से काफी हद तक आसान और उतना ही मुश्किल भी हो गया है। आप सोच रहे होंगे आसान और मुश्किल एकसाथ कैसे हो सकता है ; लेकिन बंधुजन यह सच है क्योंकि अगर आप गौर करे की लोगोंकी आमदनी पहले से ज्यादा थोड़ी बढ़ गयी है तो प्रभावी तथा महंगे इलाज तक पहुंच बना रहे है।  साथ ही में इंटरनेट की वजह से काफी लोग अपनी सेहत के बारे में जागरूक होते जा रहे है। विविध एप (Apps) और वेबसाइट और हेल्थ आर्टिकल्स के द्वारा नयी और पुरानी बिमारी के बारे में समय पर संज्ञान हो जाता है तथा उनकी गंभीरता को जानकर समय पर इला...