बौद्धिक अपंगत्व (Intellectual Disability) ही एक जटिल विकासात्मक अवस्था असून यात व्यक्तीची विचारशक्ती, शिकण्याची क्षमता, समज, निर्णयक्षमता व दैनंदिन जीवनातील जुळवून घेण्याची क्षमता मर्यादित राहते. ही अवस्था जन्मापासून किंवा बाल्यावस्थेत मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवते. बौद्धिक अक्षमतेची कारणे केवळ एका घटकापुरती मर्यादित नसून जैविक, जनुकीय, वैद्यकीय आणि सामाजिक अशा अनेक घटकांच्या परस्परसंवादातून ती निर्माण होते.
गर्भावस्थेतील
जोखमी, प्रसूतीदरम्यान होणाऱ्या गुंतागुंती, जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांतील
मेंदूवरील परिणाम, गुणसूत्रांतील दोष तसेच गरीबी, कुपोषण, अज्ञान आणि सामाजिक दुर्लक्ष
यांसारखे सामाजिक घटक बौद्धिक विकासावर गंभीर परिणाम करू शकतात. या कारणांचा सखोल अभ्यास
केल्यास बौद्धिक अपंगत्व रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर हस्तक्षेप आणि
पालक समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित होते.
म्हणूनच,
बौद्धिक अक्षमतेची कारणे गर्भावस्थेपासून बालपणापर्यंतच्या विविध टप्प्यांनुसार समजून
घेणे हे वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
1. मेंदुला झालेली इजा
मेंदूला झालेली इजा किंवा
नुकसानामुळे (Brain Damage/Injury) निर्माण होणाऱ्या बौद्धिक अपंगत्वाची
(Intellectual Disability) कारणे स्त्रोतांनुसार खाली सखोल आणि वर्णनात्मक पद्धतीने
स्पष्ट केली आहेत:
मेंदूला इजा खालील तीन
प्रमुख टप्प्यांवर होऊ शकते:
1.1) गर्भावस्थेत मेंदूला झालेली इजा (Prenatal Brain
Damage)
बाळाच्या मेंदूचा विकास
गर्भात असताना अनेक घटक त्यावर परिणाम करू शकतात:
·
आईचे वय
जास्त असणे (विशेषतः 35 वर्षांनंतर)
आईचे वय Intellectual Disability ला कसे कारणीभुत ठरु शकते. आईच्या अंड्यातील (ova) पेशी जन्मापासूनच शरीरात असतात. वय वाढत गेल्यावर:
Chromosomal nondisjunction होण्याची शक्यता वाढते, म्हणजे chromosomes नीट वेगळे न होणे यामुळे खालील स्थिती होऊ शकतात:
- Down
Syndrome (Trisomy 21) – सर्वात
सामान्य कारण आहे.
ü Trisomy 13, Trisomy 18 या सर्वांमध्ये Intellectual Disability आढळू शकते.
तसेच वय वाढल्यावर अंड्यांची गुणवत्ता कमी होते. अंड्यांची genetic stability कमी होते, DNA damage होण्याचा धोका वाढतो याचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या विकासावर होऊ शकतो.
ü गर्भधारणेदरम्यान इतर जोखमी
वयस्कर मातांमध्ये अधिक
दिसणाऱ्या समस्या:
ü
High BP,
Diabetes, Placental problems, Preterm delivery (अकाली प्रसूती), Low birth
weight
हे सगळे घटक बाळाच्या
मेंदूच्या विकासावर परिणाम करू शकतात.
सर्वच मोठ्या वयाच्या
मातांपासून जन्मलेली मुले Intellectual Disability असलेली नसतात.
फक्त risk वाढतो, हमखास होत नाही.
• आईला झालेला संसर्ग:
गरोदरपणात आईला रुबेला (Rubella), सायटोमेगॅलोव्हायरस (CMV), कांजण्या, कावीळ, गोवर,
टॉक्सोप्लाझ्मोसिस किंवा सिफिलिस यांसारखे संसर्ग झाल्यास गर्भाच्या मेंदूच्या विकासात
अडथळा निर्माण होतो.
• व्यसने आणि हानिकारक
पदार्थ: गरोदरपणात मद्यपान केल्यामुळे 'फेटल अल्कोहोल सिंड्रोम' (FAS) होऊ शकतो,
ज्यामुळे मेंदूची रचना बदलून बौद्धिक अपंगत्व येते. धूम्रपान आणि अमली पदार्थांचे सेवन
देखील मेंदूला घातक ठरते.
• कुपोषण: गरोदरपणात
आईला आयोडीनची कमतरता असणे हे जगभरातील बौद्धिक अपंगत्वाचे सर्वात मोठे टाळण्याजोगे
कारण मानले जाते. तसेच लोह (Iron), फोलेट आणि कोलीन (Choline) यांसारख्या पोषक तत्वांच्या
अभावामुळे मेंदूच्या पेशींची निर्मिती आणि पांढऱ्या द्रव्याची (White matter) वाढ खुंटते.
• विषारी रसायनांचा
संपर्क: किटकनाशके, औद्योगिक रसायने, शिसे (Lead) आणि पारा (Mercury) यांसारख्या
जड धातूंच्या संपर्कात आल्यास विकसनशील मेंदूला गंभीर इजा होते.
• ऑक्सिजनचा अपुरा
पुरवठा: गर्भाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास मेंदूच्या पेशींचे कायमस्वरूपी नुकसान
होऊ शकते.
·
किरणोत्सारी
व प्रदुषकांचे संपर्कात येणे:
गर्भावस्थेमध्ये X-Ray सारख्या किरणोत्सारी पदार्थांच्या तसेच प्रदुषकांच्या संपर्कात
आल्यावर भ्रुणाचे वाढीस धोका पोहचतो.
·
आईने गर्भधारणेदरम्यान
घेतलेली चुकीची औषधे: गर्भधारणेच्या
काळात बाळाचा मेंदू अतिशय नाजूक अवस्थेत विकसित होत असतो. त्या काळात काही औषधे
थेट बाळाच्या मेंदूवर परिणाम करतात. (Pain Killers, Antibiotics, Psychiatric,
Contraceptions Pills)
1.2) जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इजा (Perinatal
Brain Injury)
प्रसूतीदरम्यान होणाऱ्या
गुंतागुंतीमुळे मेंदूला प्रत्यक्ष इजा होऊ शकते:
• ऑक्सिजनची कमतरता
(Hypoxia/Birth Asphyxia): प्रसूतीवेळी बाळाच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी
पडल्यास मेंदूच्या पेशी नष्ट होतात, ज्यामुळे बौद्धिक अपंगत्व येते.
·
प्रशिक्षित
डॉक्टर व वैद्यकीय सुविधांचा अभाव:
बाळाच्या जन्मावेळी प्रशिक्षीत डॉक्टर, नर्स व अधुनिक वैद्यकिय सुविधा नि उपकरणांचा
वापर अत्यावश्यक आहे. तसेच रुग्णालयामध्ये अत्यंत स्वच्छता व बाळ हाताळण्यासाठी शास्त्रशुद्ध
पद्धतींचा प्रयोग केला गेला पाहिजे. याआभावी बाळाला इजा व संसर्ग होण्याची शक्यता
जास्त असते.
• मुदतपूर्व जन्म
(Premature Birth): वेळेआधी जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांच्या मेंदूची रचना
पूर्णपणे विकसित झालेली नसते, ज्यामुळे त्यांना न्यूरोडेव्हलपमेंटल अडचणींचा धोका जास्त
असतो.
• प्रसूतीमधील इजा:
फोर्सेप्स किंवा व्हॅक्यूमच्या वापरामुळे किंवा प्रसूती दीर्घकाळ चालल्यामुळे मेंदूवर
दबाव येऊन इजा होऊ शकते.
·
प्रसुतीदरम्यान
चढवलेल्या रक्ताचा संसर्ग: आईला
Blood Transfusion (रक्त चढवणे) दिले गेले असेल, तर थेट त्यामुळं बाळाला
Intellectual Disability (बौद्धिक अपंगत्व) होते असे सहसा होत नाही.पण
काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आणि गुंतागुंतींमुळे अप्रत्यक्षपणे मेंदूवर परिणाम
होऊ शकतो. जसे की, आईचा रक्तगट Rh negative आणि दिलेलं रक्त किंवा बाळाचा रक्तगट
Rh positive असेल, मातेस HIV, Hepatitis-B / C, Bacterial infection, STD (Sexual Transmitted
Dieses)असल्यास, चढवलेल्या रक्तामध्ये ऑक्सिजन पुर्ण मिसळला नसल्यास.
·
विलंबीत
प्रसुती: प्रसुतीस मुदतबाहय विलंब
झाल्यास गर्भामध्ये होणा-या बाळाच्या शी मुळे विषाक्तता निर्माण होऊन मतीमंदत्व येण्याची
शक्यता वाढते.
·
प्रसुती दरम्यान
High BP, Diabetes चा प्रभाव वाढणे, फिटस येणे, तणाव येणे, रक्तप्रवाह होणे
(Bleeding) व अवयव निकमी होणे (Organ Failure).
1.3) जन्मानंतर 0 ते 14 दिवस (Natal Period)
बाळाचे जन्मानंतर पहिल्या
ते 14 दिवसांपर्यंत कोणती कारणे Intellectual Disability ला कसे कारणीभुत ठरु शकते.
• ऑक्सिजनची कमतरता
(Hypoxia): जन्माच्या वेळी किंवा त्यानंतर लगेच बाळाच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन
न मिळाल्यास मेंदूच्या पेशींचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, जे बौद्धिक अपंगत्वाचे
एक प्रमुख कारण आहे
• चयापचय दोष
(Inborn Errors of Metabolism): फेनिलकेटोन्यूरिया (PKU) सारख्या अनुवंशिक
आजारामुळे शरीरात फेनिलॲलेनिन हे अमिनो ॲसिड साचू लागते. जर जन्मानंतर लगेच उपचार मिळाले
नाहीत, तर हे अमिनो ॲसिड रक्तामध्ये आणि मेंदूमध्ये विषारी पातळीपर्यंत साचते, ज्यामुळे
मेंदूला कायमस्वरूपी इजा होऊन गंभीर बौद्धिक अपंगत्व येते.
• नवजात तपासणीचे महत्त्व:
पीकेयू (PKU) ची तपासणी सामान्यतः जन्मानंतर २४ ते ७२ तासांच्या आत केली जाते,
जेणेकरून विषारी पातळी साचण्यापूर्वीच आहारामध्ये बदल करून अपंगत्व टाळता येते.
• मेंदूचे संसर्ग
(Childhood Infections): नवजात काळात होणारे बॅक्टेरियल मेनिंजायटिस
(Meningitis – मेंदुज्वर) आणि एन्सेफलायटिस (Encephalitis) यांसारखे संसर्ग मेंदूपर्यंत
पसरल्यास मेंदूला सूज येते आणि पेशींचे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते.
• तीव्र काविळ
(Severe Jaundice): नवजात काळात होणारी अतिशय तीव्र स्वरूपाची काविळ (Hyperbilirubinemia)
मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करून बौद्धिक कमतरता निर्माण करू शकते.
• पोषक तत्वांचा अभाव:
जर नवजात बाळाच्या शरीरात आयोडीन किंवा लोहाची (Iron) तीव्र कमतरता असेल, तर
थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीवर आणि मज्जासंस्थेच्या विकासावर (neurogenesis) विपरित
परिणाम होतो, ज्यामुळे संज्ञानात्मक विकासात अडथळे येतात.
• तीव्र सामाजिक दुर्लक्ष
(Severe Neglect): जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत बाळाला मिळणारा मानवी प्रतिसाद
आणि प्रेमळ स्पर्श ("serve and return" interaction) मेंदूच्या वाढीसाठी
आवश्यक असतो. या संवादाचा सतत अभाव राहिल्यास मेंदूच्या संरचनेत बिघाड होऊ शकतो, याचे
प्रमाण कमी असले तरीही तो एका प्रकारचा जैविक आघात मानला जातो.
• संस्थात्मक वातावरण
(Institutional Deprivation): जर बाळाला जन्मानंतर अशा वातावरणात ठेवले गेले जिथे
व्यक्तिगत काळजीचा अभाव आहे (उदा. अनाथालय, सार्वजनिक रुग्णालयाची दुर्लक्षीत व्यवस्था
असलेली खोली), तर त्याच्या मेंदूच्या कार्यावर आणि माहिती प्रक्रिया करण्याच्या वेगावर
गंभीर परिणाम होऊ शकतात.
• वैद्यकीय घटना:
जन्मानंतर लगेच होणारा मेंदूतील रक्तस्राव (Pediatric Stroke) किंवा वारंवार येणारे
झटके (Seizures) मेंदूला प्रत्यक्ष इजा पोहोचवून बौद्धिक विकासाची गती मंदावू शकतात.
ü
Multiple
Pregnancy: जुळे किंवा तिळे बाळे
बहुतेक वेळा ९ महिन्यांपूर्वी जन्माला येतात. अकाली जन्मलेले बाळ पूर्ण विकसित नसते.
मेंदू, फुफ्फुसे व शरीराची इतर अवयव पूर्ण तयार नसतात. यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन
व पोषण मिळत नाही आणि बौद्धिक विकासावर परिणाम होऊ शकतो.
तसेच यामध्ये आईचे पोषण
अनेक बाळांमध्ये विभागले जाते. त्यामुळे काही बाळे खूप कमी वजनाची जन्माला येतात. कमी
वजनामुळे मेंदूचा विकास मंदावतो आणि पुढे बौद्धिक क्षमता कमी होऊ शकते.
1.4) जन्मानंतर मेंदूला झालेली इजा (Postnatal Brain
Damage)
मेंदूचा विकास सुरू असताना
(पंधराव्या दिवसापासुन ते 22 वयापर्यंत) झालेल्या अपघातांमुळे किंवा आजारांमुळे पुढीलप्रमाणे
बौद्धिक अक्षमता येऊ शकते:
• अपघात आणि गंभीर
मार (TBI): रस्ते अपघात, उंचावरून पडणे किंवा शारीरिक अत्याचारामुळे डोक्याला गंभीर
मार लागल्यास, किंवा मेंदुमध्ये रक्ताची गाठ होऊन
किंवा सुज आलेस (Traumatic Brain Injury) कायमस्वरूपी बौद्धिक नुकसान होते.
• मेंदूचे आजार:
बॅक्टेरियल मेनिंजायटिस (Meningitis – मेंदुज्वर), एन्सेफलायटिस (Encephalitis) किंवा
गोवर (Measles) यांसारखे संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास मेंदूला सूज येऊन पेशींचे नुकसान
होते.
• विषबाधा: किटकनाशके,
विषाक्त पदार्थ व शिशाच्या (Lead) संपर्कात आल्यामुळे होणारी विषबाधा ही मेंदूसाठी
अत्यंत घातक असते; यामुळे दरवर्षी लाखो मुलांना बौद्धिक अपंगत्व येते.
• तीव्र दुर्लक्ष
(Severe Neglect): अन्नाचा अभाव किंवा प्रतिसादात्मक काळजी न मिळणे (Severe
neglect) हा मेंदूवर झालेला एक प्रकारचा जैविक हल्लाच असतो, ज्यामुळे मेंदूच्या कार्यकारी
प्रणालीमध्ये (Executive function) बिघाड होतो.
ü मेंदूच्या पेशींना कायमस्वरूपी इजा (Permanent
Damage):
मेंदूला झालेली इजा का
घातक ठरते, याची काही तांत्रिक कारणे स्त्रोतांमध्ये दिली आहेत:
वरील कोणत्याही कारणांनी
मेंदूतील मज्जापेशी (Neurons) आणि मज्जातंतू (Nerve cells) एकदा नष्ट झाले (न्यूरॉन्सचा
ऱ्हास) की ते पुन्हा निर्माण होणे कठीण असते. इजेमुळे मेंदूतील विविध भागांना जोडणाऱ्या
'न्यूरल सर्किट्स'मध्ये अडथळा येतो, ज्यामुळे माहिती प्रक्रिया करण्याची गती मंदावते.
इजेमुळे मज्जातंतूंच्या संरक्षणात्मक आवरणावर (Myelin) परिणाम होतो, ज्यामुळे मेंदूचे
संदेश वहन नीट होत नाही.
ü जन्मानंतर टाळलेले, अपुर्ण किंवा उशिरा केलेले लसीकरण:
बाळाच्या जन्मानंतर टाळलेले किंवा उशिरा केलेले
लसीकरण हे थेट Intellectual Disability (बौद्धिक अपंगत्व) निर्माण करत नाही,
पण लसीकरण न झाल्यामुळे होणारे गंभीर संसर्गजन्य आजार मेंदूला इजा करून बौद्धिक अपंगत्वाला
कारणीभूत ठरू शकतात.लसीकरण न झाल्यास मेंदूज्वर, गोवरजन्य मेंदूचा दाह, पोलिओ यांसारखे
आजार होण्याची शक्यता वाढते,ज्यामुळे मेंदू पेशींचे नुकसान होऊन बौद्धिक विकास खुंटतो.
निष्कर्ष: मेंदूला झालेली कोणतीही इजा ही बौद्धिक विकासावर
कायमस्वरूपी परिणाम करू शकते. मात्र, गरोदरपणात आईचे योग्य पोषण (विशेषतः आयोडीन आणि
लोह), सुरक्षित प्रसूती, वेळेवर लसीकरण आणि अपघात प्रतिबंधात्मक उपायांनी यातील अनेक
कारणे टाळता येतात.
2. गुणसुत्रातील
दोष
मानवात ४६ गुणसूत्रे
(23 जोड्या) असतात.यात संख्या बदलणे (जास्त/कमी) किंवा रचना बदलणे (तुटणे,
उलटणे, जोडणे) असे दोष झाल्यास मेंदूच्या विकासावर परिणाम होतो व बौद्धिक अपंगत्व
(Intellectual Disability) येऊ शकते.
प्रत्येक जोडीतील एक आईकडून
आणि एक वडिलांकडून येते. या 22 जोड्या शरीराची वाढ, बुद्धिमत्ता, अवयवांची
रचना ठरवतात. यामधील दोषांमुळे बौद्धिक अक्षम्यता,जन्मजात विकार, शारीरिक-मानसिक
विकासात अडथळे होऊ शकतात तर 23 वी जोडी जोडी बाळाचे लिंग ठरवते.
गुणसूत्र
(Chromosome) आणि रंगसूत्र (Chromatid) मधील फरक
ü
गुणसूत्र = जनुकांची माहिती वाहून नेणारी रचना, गुणसूत्र
DNA + प्रथिने (proteins) यांनी बनलेले असते
DNA मध्येच आपली जनुकीय माहिती
(genes) असते.मानवी पेशीत 46 गुणसूत्रे असतात
ü
रंगसूत्र = गुणसूत्राची अर्धी/एक बाजू
|
मुद्दा |
गुणसूत्र
(Chromosome) |
रंगसूत्र
(Chromatid) |
|
अर्थ |
जनुकांची
माहिती असलेली पूर्ण रचना |
गुणसूत्राचा
एक भाग |
|
संख्या |
मानवात
46 (23 जोड्या) |
प्रतिकृतीनंतर
92 (46×2) |
|
रचना |
एक
किंवा दोन रंगसूत्रांनी बनलेले |
DNA
चा एक धागा |
|
कधी
दिसते |
पेशी
विभाजनापूर्वी व दरम्यान |
पेशी
विभाजनाच्या वेळी |
|
संबंध |
एक
गुणसूत्र = दोन बहिणी रंगसूत्रे |
दोन
रंगसूत्रे मिळून एक गुणसूत्र |
|
उपयोग |
वारसागत
माहिती वाहून नेते |
विभाजनात
नवीन पेशींना माहिती देते |
गुणसुत्रातील दोषांमुळे
व्यक्तीमध्ये जन्मजात दोष निर्माण होतात. म्हणजे एक लक्षण नाही ती अनेक लक्षणांची
एकत्र अवस्था असते त्यास सिंड्रोम म्हणतात. उदा.Down Syndrome मध्ये सहसा चेहऱ्याची
विशिष्ट रचना, शिकण्यात अडचण (Intellectual Disability), बोलण्यास उशीर, हृदयाचे जन्मजात
दोष ही सगळी लक्षणे एकत्र दिसतात म्हणून त्याला सिंड्रोम म्हणतात.
DOWN SYNDROME
:
Down Syndrome हा जन्मतः
आढळणारा गुणसूत्रजन्य विकार आहे. सामान्य माणसाकडे 46 गुणसूत्रे असतात,
पण Down Syndrome मध्ये 21व्या गुणसूत्राची एक अतिरिक्त प्रत असते. याला Trisomy
21 असेही म्हणतात. यामध्ये गुणसुत्रांच्या 21 व्या जोडीमध्ये एक x अधिक जोडला
जातो त्यामुळे एकूण गुणसूत्रे 47 होतात. डाउन सिंड्रोम हे जागतिक स्तरावर बौद्धिक
अपंगत्वाचे सर्वात सामान्य गुणसूत्र कारण आहे, जे गुणसूत्र २१ च्या पूर्ण किंवा आंशिक
अतिरिक्त प्रतीमुळे उद्भवते. यामध्ये अंदाजे 7०० व्यक्तींपैकी १ व्यक्तीला याचा परिणाम
होतो.
जॉन लँग्डन डाउन (१८२८-१८९६)
हे एक ब्रिटिश वैद्य होते ज्यांना डाउन सिंड्रोमचे वर्णन करणारे पहिले व्यक्ती म्हणून
ओळखले जाते. १८६६ मध्ये, त्यांनी या अनुवांशिक स्थितीची ओळख पटवली आणि त्याला
"मंगोलिझम" असे नाव दिले, जे अतिरिक्त ट्रायसोमी २१ मुळे होते.
वैशिष्ट्ये : चेहरा थोडा सपाट दिसतो, डोळे थोडे तिरके / बदामासारखे
दिसतात, डोळ्यांच्या आतील कोपऱ्यात लहान त्वचेची घडी (epicanthic fold) असू शकते. नाक
लहान व सपाट असते. तोंड थोडे उघडे राहते, जीभ थोडी मोठी, पसरट, बाहेर आणि चिरा पडलेली
- खरखरीत दिसू शकते. कान, नाक, डोळे व मान लहान असते. तळहातावर एकच सरळ रेषा
(Single palmar crease), बोटे लहान व जाड पायाच्या अंगठ्या व शेजारच्या बोटामध्ये जास्त
अंतर असते.
तसेच बोलायला उशीर, शब्द स्पष्ट न उच्चारणे,
योग्य Speech Therapy मुळे बोलण्यात सुधारणा होते. तसेच शिकण्याचा वेग मंद, लक्ष केंद्रित
करण्यात अडचण, नवीन गोष्टी शिकायला जास्त वेळ पण पुनरावृत्ती आणि योग्य प्रशिक्षणाने
चांगली प्रगती होते. जन्मजात हृदयाचे दोष, थायरॉईड समस्या, ऐकण्याची किंवा पाहण्याची
अडचण येते.
EDWARDS
SYNDROME :
एडवर्ड्स सिंड्रोम हा एक जनुकीय (Genetic) आजार आहे.याला Trisomy
18 असेही म्हणतात.या आजारात 18 व्या गुणसूत्राची (Chromosome 18) एक जास्त प्रत
असते. सामान्यपणे 23 जोड्या = 46 गुणसूत्रे असतात, पण या आजारात 47 गुणसूत्रे
होतात. याचे मुख्य कारण गर्भधारणेदरम्यान आई किंवा वडिलांच्या पेशी विभाजनात चूक
(Chromosome Non Disjunction) होते त्यामुळे बाळाला 18 व्या गुणसूत्राच्या
3 प्रती मिळतात. बहुतेक वेळा वंशानुगत नसते. मुलींमध्ये जास्त आढळतो कारण अशा अवस्थेतील
मुलगे गर्भात टिकत नाहीत किंवा जन्मोपरांत मृत्युचे प्रमाण जास्त असते परंतु मुली गर्भात
थोडया जास्त तग धरतात. परिणामी जन्मलेल्या बाळांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त दिसते.
प्रकार (Types of
Edwards Syndrome)
Full Trisomy 18
- बाळाच्या सर्व पेशींमध्ये 18 व्या गुणसूत्राची
3 प्रती असतात - सर्वात गंभीर प्रकार
Mosaic Trisomy 18
- काही पेशींमध्ये 3 प्रती, तर काही पेशींमध्ये सामान्य 2 प्रती
असतात - लक्षणे तुलनेने कमी
Partial Trisomy
18
- 18 व्या गुणसूत्राचा संपूर्ण नव्हे तर काही
भागच हा दुसऱ्या गुणसूत्राला जोडलेला असतो - फारच दुर्मिळ
या अवस्थेच्या शारिरिक वैशिष्टयामुळे गर्भावस्थेत
Ultrasound (अवयव दोष दिसतात),
Blood tests (Screening), Amniocentesis / CVS यांतुन निश्चित निदान होऊ शकते.
एडवर्ड्स सिंड्रोम हा
18 व्या गुणसूत्राच्या अतिरिक्त प्रतीमुळे होणारा गंभीर जनुकीय आजार आहे. यामध्ये
मेंदू, शरीर, अंतर्गत अवयव आणि विकास सर्वांवर परिणाम होतो.
मेंदू व बौद्धिक वैशिष्ट्ये
- मेंदूचा अपूर्ण / मंद विकास, तीव्र बौद्धिक
अक्षम्यता (Severe Intellectual Disability), शिकण्याची क्षमता अत्यंत कमी,
बोलण्यात व समजण्यात अडचण, हालचालींचा समन्वय (coordination) कमी, काही बाळांमध्ये
फिट्स (आकडी).
शारीरिक (बाह्य) वैशिष्ट्ये
·
डोके लहान
(Microcephaly), कपाळ अरुंद,लहान जबडा (Small jaw / Micrognathia), तोंड लहान, कान
खाली बसलेले व वाकडे, डोळे लहान, कधी कधी पापणी खाली , पाय वाकडे, चालण्यास
तीव्र अडचण, जन्मावेळी कमी वजन, छाती
अरुंद, स्नायू कमजोर (Hypotonia).
अंतर्गत अवयवांचे दोष
जन्मजात हृदयदोष, मुत्रपिंड,
पचनसंस्था व श्वसनसंस्था यांचे तीव्र विकार.
गंभीर बौद्धिक आणि शारीरिक
अपंगत्व असलेल्या मुलांमध्ये अकाली मृत्यूचा (Premature death) धोका लक्षणीयरीत्या
जास्त असतो, ज्यामुळे त्यांचे आयुर्मान कमी आढळते.
Sex Chromosome Defects:
- लिंग गुणसूत्रांमधील दोष (Sex Chromosome
Defects) हे बौद्धिक अक्षमतेचे (Intellectual Disability) एक प्रमुख आणि महत्त्वाचे
कारण आहेत. मानवामध्ये लिंग निश्चित करण्यासाठी X आणि Y ही दोन गुणसूत्रे असतात.
मानवात 23 वी जोडी लिंगसूत्रांची (Sex Chromosomes) असते. स्त्री :
XX, पुरुष : XY या लिंगसूत्रांमध्ये संख्या किंवा रचना बदलली तर त्याला
लिंगसूत्रातील दोष म्हणतात. हे दोष गर्भधारणेदरम्यान पेशी विभाजनात
झालेल्या चुकांमुळे (Non-disjunction) होतात. या गुणसूत्रांच्या संख्येत किंवा
रचनेत बदल झाल्यास त्याचा मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. क्लाइनफेल्टर सिंड्रोम,
टर्नर सिंड्रोम हे लिंग गुणसुत्रांतील दोषांमुळे उद्भवतात ज्यांमध्ये बौद्धिक
अक्षमता येण्याची दाट शक्यता असते.
·
सगोत्र
विवाहाचा परिणाम: ज्या समाजात
जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्ने होतात, तिथे लिंग गुणसूत्रांशी संबंधित नसले तरी 'ऑटोसोमल
रिसेसिव्ह' (Autosomal Resosive म्हणजेच असा जनुकीय आजार की ज्यात आई-वडील दोघांकडून
दोषयुक्त जनुक एकत्र आल्याने त्यांचे वर्चस्व वाढुन अनुवांशिक दोष निर्माण होतोत.
यामध्ये आई वडीलांना त्यापैकी आजार किंवा अवस्था नसते परंतु ते त्या अवस्थेला वा आजाराच्या
स्त्रोताचे वाहक असतात ज्यामुळे ते पुढील पिढीला / आपत्याला मिळतात. यामध्ये थॅलेसेमिया,
सिकल सेल अॅनिमिया, Phenylketonuria (PKU), बौद्धिक अपंगत्व यांचा समावेश आहे.) दोष
वाढतात, मात्र जनुकीय दोषांमुळे होणाऱ्या बौद्धिक अक्षमतेचे एकूण प्रमाण अशा ठिकाणी
३ ते ४ पटीने जास्त असते. लिंग गुणसूत्रांतील दोष हे मेंदूच्या पेशींची निर्मिती, मज्जापेशींमधील
जोडणी आणि आवश्यक प्रथिनांचे उत्पादन यावर थेट परिणाम करतात, ज्यामुळे व्यक्तीच्या
शिकण्याच्या आणि विचार करण्याच्या क्षमतेत लक्षणीय मर्यादा येतात परिणामी बौद्धिक
अक्षमता निर्माण होते.
Klinefelter Syndrome:
क्लाइनफेल्टर सिंड्रोम
(Klinefelter Syndrome) हा लिंग
गुणसूत्रांशी (Sex Chromosomes) संबंधित एक महत्त्वाचा जनुकीय विकार आहे, जो प्रामुख्याने
पुरुषांमध्ये आढळतो. या सिंड्रोमचे स्पष्टीकरण आणि बौद्धिक अक्षमतेशी असलेला सहसंबंध
खालीलप्रमाणे आहे:
क्लाइनफेल्टर सिंड्रोमचे
स्पष्टीकरण
• गुणसूत्रीय रचना:
हा विकार पुरुषांमध्ये एका अतिरिक्त X गुणसूत्रामुळे उद्भवतो. सामान्यतः पुरुषांमध्ये
XY ही दोन लिंग गुणसूत्रे असतात, परंतु या सिंड्रोममध्ये ही रचना XXY अशी
47 गुणसुत्रांची असते.
• निर्मिती: हा
दोष सहसा पालकांकडून वारशाने मिळत नाही, तर आईचे वाढते वयातील गर्भधारणा अंडयामध्ये
दोष निर्माण करते. गुणसूत्रांच्या विभाजनादरम्यान झालेल्या नैसर्गिक जनुकीय अपघातामुळे
घडतो. हा लिंग गुणसूत्रांमधील सर्वात सामान्य विकारांपैकी एक असून तो मुलांच्या शारीरिक
आणि बौद्धिक विकासावर परिणाम करतो.
बौद्धिक अक्षमतेशी (Intellectual Disability)
सहसंबंध
क्लाइनफेल्टर सिंड्रोम
आणि बौद्धिक क्षमता यांचा संबंध विविध स्तरांवर दिसून येतो:
• बुद्ध्यांकावर परिणाम
(Impact on IQ): क्लाइनफेल्टर सिंड्रोम असलेल्या व्यक्तींचा सरासरी बुद्ध्यांक
(Full-scale IQ) सुमारे 95 इतका असतो. हा बुद्ध्यांक सामान्य श्रेणीत असला तरी,
त्यांच्या निरोगी भावंडांच्या किंवा इतर मुलांच्या बुद्ध्यांकाच्या तुलनेत तो काहीसा
कमी असू शकतो. या व्यक्तींमध्ये बौद्धिक आणि शारीरिक विकासात लक्षणीय मर्यादा
किंवा अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे त्यांना बौद्धिक अपंगत्वाच्या (ID) निकषांमध्ये वर्गीकृत
केले जाण्याची शक्यता असते.
• विकासात्मक विलंब
(Developmental Delays): या सिंड्रोममुळे मुलांमध्ये बोलण्यास उशीर होणे
(Speech delays), शब्द उच्चारण्यात किंवा संभाषणात अडचणी येणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेत
आव्हाने निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात.जरी अनेक व्यक्ती स्वतंत्र आयुष्य जगू शकतात,
तरीही काही प्रकरणांमध्ये तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि शैक्षणिक प्रगती
यामध्ये अडचणी येत असल्याने त्यांना अतिरिक्त समर्थनाची (Support) गरज भासते.
• सह-आजार
(Comorbidities): हा विकार अनेकदा इतर न्यूरोडेव्हलपमेंटल समस्या किंवा वर्तणुकीशी
संबंधित विकारांशी जोडलेला असतो, जो बौद्धिक कार्यक्षमतेवर अधिक ताण निर्माण करू शकतो.
या सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) आणि एडीएचडी
(ADHD) ची लक्षणे आढळण्याची शक्यता सामान्य मुलांच्या तुलनेत जास्त असते, ज्यामुळे
त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीत अडथळे येतात.
थोडक्यात सांगायचे तर,
क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा नेहमीच तीव्र बौद्धिक अपंगत्वास कारणीभूत ठरत नाही, परंतु
तो मेंदूच्या कार्यावर आणि माहिती प्रक्रिया करण्याच्या गतीवर परिणाम करतो,
ज्यामुळे शिकण्यातील आणि अनुकूल वर्तनातील मर्यादा स्पष्टपणे जाणवतात.
Turner Syndrome :
टर्नर सिंड्रोम Turner
Syndrome हा फक्त मुलींमध्ये आढळणारा जन्मतःचा गुणसूत्रजन्य विकार आहे. सामान्य
स्त्री: 46 गुणसूत्रे (XX) असतात परंतु यामध्ये एक X गुणसूत्र कमी किंवा अपूर्ण
45 गुणसुत्रे असतात. गर्भधारणेदरम्यान X गुणसूत्राची विभागणी पूर्ण न होणे हे मुख्य
कारण आहे.
Turner Syndrome ची
प्रमुख शारीरिक लक्षणे
·
उंची कमी
राहते, मान रुंद व जाळीसारखी (Webbed neck), छाती रुंद, स्तनांमध्ये अंतर जास्त, मासिक
पाळी येत नाही किंवा उशिरा येते, अंडाशयांची वाढ अपुरी → वंध्यत्व, काहींमध्ये हृदय व मूत्रपिंडाचे जन्मजात दोष व कुपोषित
शरीरयष्टी. सर्व लक्षणे प्रत्येक मुलीमध्ये असतीलच असे नाही.
X गुणसूत्रावरील काही
जनुके मेंदूच्या विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असतात. एक X कमी असल्यामुळे मेंदूतील काही
भागांचा विकास अपुरा राहतो. माहितीवर प्रक्रिया करणे आणि लक्ष केंद्रित करण्याच्या
'एक्झिक्युटिव्ह कंट्रोल'मध्ये त्यांना मर्यादा जाणवू शकतात.स्मरणशक्ती विशेषतः 'स्थानिक
स्मृती' (Spatial memory) मध्ये कमजोरी आढळते. तसेच गणित व इतर समजेशी संबंधित भाग.
Fragile X
Syndrome:
फ्रॅजिल एक्स सिंड्रोम
(Fragile X Syndrome - FXS) हे
जगभरातील अनुवांशिक बौद्धिक अपंगत्वाचे सर्वात सामान्य कारण आहे. हा विकार X
गुणसूत्रावर असलेल्या FMR1 या जनुकातील दोषामुळे होतो. सामान्य स्थितीत FMR1 जनुक
मेंदूच्या विकासासाठी आवश्यक प्रथिने तयार करते. Fragile X Syndrome मध्ये हे जनुक
नीट काम करत नाही व मेंदूच्या विकासासाठी आवश्यक प्रथिने तयार होत नाहीत. त्यामुळे
मेंदू पेशींमधील संपर्क (Synapses) योग्य प्रकारे विकसित होत नाही. हा Down
Syndrome नंतरचा सर्वात सामान्य आनुवंशिक कारणाचा बौद्धिक अपंगत्व विकार आहे. हा
सिंड्रोम वारसागत असू शकतो. मुलांमध्ये (XY) लक्षणे जास्त तीव्र म्हणजेच
1000 पुरुषांमध्ये 1 तर मुलींमध्ये (XX) सौम्य लक्षणे म्हणजेच 2000 स्त्रीयांमध्ये
1 असे दिसतात.
Fragile X
Syndrome ची शारीरिक व वर्तनात्मक लक्षणे
शारीरिक
- लांब चेहरा,मोठे कान,सांधे सैल.
वर्तनात्मक
- बोलायला उशीर, डोळ्यांत डोळे घालून न पाहणे,
अस्वस्थपणा, चंचलपणा, ADHD / Autism-सदृश लक्षणे.
FMRP' प्रथिनाचा अभाव
थेट मेंदूच्या संरचनेवर आणि मज्जापेशींच्या संवादावर परिणाम करतो, 'FMRP' प्रथिन मेंदूतील
सिनॅप्स (Synapses) म्हणजेच मज्जापेशींच्या जोडणीचे नियमन करण्यासाठी अत्यंत
आवश्यक असते. या प्रथिनाच्या अभावामुळे मेंदूतील संदेशवहनाची प्रक्रिया विस्कळीत होते
आणि माहिती प्रक्रिया करण्याची गती मंदावते जे बौद्धिक अक्षमतेचे मुख्य कारण ठरते. पुरुषांमध्ये
केवळ एकच X गुणसूत्र असल्याने त्यांच्यात हा सिंड्रोम सौम्य ते गंभीर बौद्धिक अपंगत्व
निर्माण करतो. स्त्रियांमध्ये दोन X गुणसूत्रे असल्याने आणि 'X-इनॲक्टिव्हेशन' प्रक्रियेमुळे
त्यांच्यात परिणाम कमी तीव्र असतो; केवळ एक-तृतीयांश बाधित स्त्रियांमध्ये बौद्धिक
अपंगत्व दिसून येते.मेंदू पेशींमधील संदेशवहन (Neural signaling) कमकुवत, स्मरणशक्ती,
लक्ष, समस्या सोडवणे यावर परिणाम, भाषा व सामाजिक समज कमी विकसित व बौद्धिक अक्षमतेची
तीव्रता व्यक्तीनुसार बदलते.
Translocation of Genes (जनुकांचे स्थलांतर) व बौद्धिक अपंगत्व
मानवाच्या पेशींमध्ये
एकूण ४६ गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्रावर अनेक जनुके असतात, जी शरीराच्या व मेंदूच्या
वाढीसाठी आवश्यक माहिती वाहून नेतात. Translocation म्हणजे एका गुणसूत्राचा
काही भाग तुटून दुसऱ्या गुणसूत्राला जाऊन जोडला जाणे. हा बदल गर्भधारणेच्या वेळी किंवा
पेशींच्या विभाजनादरम्यान होऊ शकतो आणि तो जन्मतःही उपस्थित असू शकतो.
Translocation चे दोन
प्रमुख प्रकार आढळतात. Balanced Translocation मध्ये जनुकांची देवाणघेवाण होते,
पण एकूण जनुकीय माहिती कमी-जास्त होत नाही. अशा व्यक्ती दिसायला सामान्य असू शकतात.
मात्र Unbalanced Translocation मध्ये काही जनुके जास्त होतात किंवा काही हरवतात.
यामुळे शरीराच्या विविध अवयवांबरोबरच मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होतो.
जनुकांचे स्थलांतर बौद्धिक
अपंगत्वाशी थेट संबंधित आहे कारण मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असलेली जनुके चुकीच्या
ठिकाणी जातात, दडपली जातात किंवा पूर्णपणे नष्ट होतात. काही महत्त्वाची जनुके हरवल्यास
मेंदू पेशींची निर्मिती, त्यांच्यातील संपर्क (synaptic connections) आणि मेंदूतील
रासायनिक संदेशवाहन प्रणाली बाधित होते. परिणामी स्मरणशक्ती, समजशक्ती, लक्ष केंद्रित
करण्याची क्षमता व शिकण्याची गती कमी होते.
Unbalanced
Translocation असलेल्या मुलांमध्ये बहुधा सौम्य ते तीव्र बौद्धिक अपंगत्व, बोलण्यास
उशीर, शिकण्यातील अडचणी, फिट्स तसेच वर्तनात्मक समस्या दिसून येतात. काही वेळा विशिष्ट
सिंड्रोम्सही निर्माण होतात. उदाहरणार्थ, १४ व २१ क्रमांकाच्या गुणसूत्रांमधील
Robertsonian Translocation मुळे Down Syndrome चा धोका वाढतो. अशा प्रकरणांमध्ये बौद्धिक
अपंगत्व हा प्रमुख लक्षण असतो.
Balanced
Translocation असलेल्या पालकांकडून गर्भाला Unbalanced Translocation मिळू शकते. त्यामुळे
अशा कुटुंबांमध्ये वारंवार गर्भपात, जन्मतः अपंगत्व किंवा बौद्धिक अपंगत्व असलेली मुले
जन्माला येण्याची शक्यता वाढते. यामुळे Genetic Counselling चे महत्त्व अधोरेखित होते.
3.सामाजिक परिणाम
बौद्धिक अपंगत्व निर्माण
होण्यामागे केवळ जैविक किंवा आनुवंशिक कारणेच नसून सामाजिक घटकांचाही मोठा वाटा असतो.
गर्भधारणेपासून ते बालपणाच्या सुरुवातीच्या वर्षांपर्यंत समाज, कुटुंब आणि आर्थिक परिस्थितीचा
बाळाच्या मेंदूच्या वाढीवर थेट परिणाम होतो. या काळात निर्माण झालेले सामाजिक अडथळे
मेंदूच्या विकासात कायमस्वरूपी मर्यादा निर्माण करू शकतात.
प्रदूषण (Pollution) आणि
गरीबी यांचा बौद्धिक विकासावर गंभीर परिणाम होतो. संशोधनानुसार गरीबी रेषेखालील कुटुंबांतील
मुलांमध्ये बौद्धिक अक्षमतेचे प्रमाण श्रीमंत कुटुंबांच्या तुलनेत सुमारे दुप्पट आढळते.
प्रदूषित वातावरण, अस्वच्छता आणि विषारी घटकांमुळे मेंदूच्या पेशींना हानी पोहोचते.
यासोबतच बालपणात मिळणारा प्रेमळ प्रतिसाद आणि संवादाचा अभाव, म्हणजेच Serve and
Return न होणे, हा मेंदूवर झालेला एक प्रकारचा “जैविक हल्ला” ठरतो. यामुळे मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (नियोजन व लक्ष केंद्रित
करण्यासाठीचा भाग) आणि हिप्पोकॅम्पस (स्मरणशक्तीचे केंद्र) यांची वाढ खुंटते किंवा
त्यातील जोडणी विस्कळीत होते.
गरोदरपणात व बाल्यावस्थेत
कुपोषण हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक घटक आहे. आईला योग्य पोषण न मिळाल्यास तसेच बाळाला
लोह, आयोडीन, प्रथिने व आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास मेंदूचा विकास अपुरा
राहतो. गरीबीमुळे दर्जेदार अन्न, आरोग्यसेवा व शिक्षण उपलब्ध होत नाही. परिणामी लसीकरण
अपूर्ण राहते आणि वारंवार आजार होतात, जे मेंदूच्या वाढीच्या महत्त्वाच्या काळात अडथळा
निर्माण करतात.
अज्ञान व चुकीच्या सामाजिक
समजुतीमुळे वेळेवर वैद्यकीय उपचार घेतले जात नाहीत. लसीकरण टाळणे, अंधश्रद्धा व झाड-फुंक
यांमुळे बाळाला मेंदूज्वर, तीव्र ताप व फिट्स यांसारखे आजार होऊ शकतात. प्रसूतीदरम्यान
अपुरी आरोग्यसेवा, ऑक्सिजनची कमतरता किंवा संसर्ग यामुळे मेंदूच्या पेशींना इजा होऊन
बौद्धिक अपंगत्व येऊ शकते.
काही समाजांमध्ये सगोत्र
किंवा जवळच्या नातेवाईकांमधील विवाहांची परंपरा आढळते. अशा ठिकाणी मुलांमध्ये जनुकीय
दोषांमुळे (Autosomal Recessive Intellectual Disability) बौद्धिक अपंगत्व येण्याची
शक्यता तीन ते चार पटीने जास्त असते. तसेच जर नवजात बाळाला अनाथालयासारख्या संस्थात्मक
वातावरणात ठेवले गेले, जिथे वैयक्तिक काळजी आणि मानवी स्पर्शाचा अभाव असतो, तर मेंदूतील
विद्युत क्रिया (EEG) मंदावते आणि संज्ञानात्मक विकासात गंभीर अडथळे निर्माण होतात.
तसेच सामाजिक दुर्लक्ष,
बालमजुरी, शोषण, सततचा मानसिक ताण आणि स्त्री-पुरुष भेदभाव यांमुळे मुलांच्या बौद्धिक
क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. सामाजिक कलंकामुळे अपंग मुलांना लपवले जाते व समाजापासून
दूर ठेवले जाते, ज्यामुळे त्यांच्या विकासाच्या संधी नष्ट होतात.
म्हणूनच, योग्य पोषण,
स्वच्छ पर्यावरण, प्रेमळ संवाद, आरोग्यसेवा, शिक्षण, सामाजिक स्वीकार आणि वेळेवर हस्तक्षेप
या सामाजिक बाबी बौद्धिक अपंगत्व रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
सकारात्मक निष्कर्ष
/ सारांश (Conclusion)
बौद्धिक
अपंगत्वाची कारणे विविध स्वरूपाची असली तरी त्यापैकी अनेक कारणे टाळण्याजोगी व नियंत्रित
करण्याजोगी आहेत, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य वेळी आईचे पोषण, गर्भावस्थेतील
संसर्ग प्रतिबंध, सुरक्षित व प्रशिक्षित वैद्यकीय देखरेखीखाली प्रसूती, नवजात तपासण्या,
वेळेवर व पूर्ण लसीकरण, तसेच अपघात व संसर्ग टाळण्यासाठीची काळजी यांमुळे बौद्धिक अपंगत्वाचे
प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येते.
गुणसूत्रीय
व जनुकीय दोषांमुळे निर्माण होणारे बौद्धिक अपंगत्व पूर्णपणे टाळता येत नसले तरी लवकर
निदान, Genetic Counselling, Early Intervention, Speech Therapy, Occupational
Therapy आणि विशेष शिक्षण यांच्या माध्यमातून अशा मुलांची कार्यक्षमता, स्वावलंबन व
जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारता येते.
सामाजिक
घटक — जसे की गरीबी, कुपोषण, अज्ञान, सामाजिक दुर्लक्ष व कलंक — हे बौद्धिक विकासावर
गंभीर परिणाम करतात. मात्र प्रेमळ संवाद, सुरक्षित वातावरण, योग्य शिक्षण, सामाजिक
स्वीकार आणि कुटुंबाचा सकारात्मक दृष्टिकोन यांमुळे मेंदूच्या विकासाला चालना मिळते.
“बौद्धिक अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे, तर वेगळी
क्षमता” हा दृष्टिकोन स्वीकारल्यास अशा व्यक्तींना समाजाच्या
मुख्य प्रवाहात सन्मानाने सामावून घेता येते.
म्हणूनच,
बौद्धिक अपंगत्व रोखण्यासाठी वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांचा समन्वय, पालकांचे
प्रबोधन, आणि समाजाची जबाबदारीची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य हस्तक्षेप
केल्यास अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल, सन्मानपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवता येऊ शकते.
बौद्धिक अपंगत्वासाठी
प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय किंवा खबरदारी काय घ्यावी
बौद्धिक अपंगत्व
(Intellectual Disability) पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु योग्य खबरदारी आणि प्रतिबंधात्मक
उपायांनी यातील अनेक कारणे टाळता येतात. स्त्रोतांनुसार प्रतिबंधात्मक उपाय खालीलप्रमाणे
आहेत:
प्राथमिक प्रतिबंधात्मक
उपाय : म्हणजे बौद्धिक अक्षमता येऊ नये म्हणुन प्रयत्नीशील राहणे.
1.
नात्यामधील
/ सगोत्र विवाह टाळणे.
2.
प्रदुषणाच्या
ठिकाणी अधिवास टाळणे.
3.
गर्भवती महिलांची
वेळोवेळी तपासणी करणे.
4.
प्रशिक्षीत
डॉक्टरांचा सल्ल घेणे.
5.
मुल जन्माला
येताना अत्यंत चांगल्या व अधुनिक वैद्यकिय सुविधांचा वापर करणे.
6.
मेंदुचा आजार
होऊ नये म्हणुन काळजी घेणे. अजुन काय असु शकते ?
व्दितीय प्रतिबंधात्मक
उपाय :
मुल मतिमंद होणार आहे
हे लक्षात आल्यावर मतिमंदत्वाची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील राहणे.(उदा:
मुल हे मतीमंद होण्याची शक्यता आहे हे कळल्यावर त्याच्यावर प्रथमपासुनच बौद्धिक उपचार
चालु करणे.) त्याच्या वेगवेगळया अवयवांना उद्यपित करण्याचा प्रयत्न करणे जेणेकरुन
तीव्रत कमी होईल.)
तृतिय प्रतिबंधात्मक
उपाय :
म्हणजे पुनर्वसन. बौद्धिक
अक्षमता प्रतिबंध करण्यासाठी पालक, कुटुंबीय शिक्षक, डॉक्टर आणि समाज या सर्वांचे
एकत्रीत प्रयत्न महत्वाचे असतात. मुल जन्मण्यापुर्वीच मुलाची आणि आईची काळजी घेण्यास
सुरुवात केली पाहीजे. मुल 18 वर्षांचे हाईपर्यंत काळजी घेतली पाहिजे.
Comments
Post a Comment